दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । सातारा । येथील वाढे फाट्यानजीक असलेल्या जयमल्हार हौसिंग सोसायटीत रहाणार्या युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरीतील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेश संजय मोहोटकर (वय 27) यांनी फिर्याद दिली. अनिकेत अतुल मोहोटकर (रा. शाहूपुरी, सातारा) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी ही मारहाण केली. दि. 20 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयितांनी घरात घुसून महेश याच्यावर खोटा आरोप करून महेशच्या आईला शिवीगाळ मारहाण केली तसेच महेश याच्या नाकावर, डोक्यात, कानावर, ओठावर कुकरच्या झाकणाने मारहाण करून जखमी केले. तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.