विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. ०५ : तालुक्यातील एका गावात सासऱ्याला मारहाण सुरु असताना ती सोडविण्यासाठी गेलेेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक माहिती अशी, पीडित महिला सातारा तालुक्यातील एका गावातील असून वैभव उर्फ विकी फाळके (पूर्ण नाव माहित नाही. रा. सैदापूर, ता. सातारा), गणेश जाधव (पूर्ण नाव माहित नाही. रा. मल्हार पेठ, सातारा) या दोघांनी दारु पिऊन आपआपसात संगनमत करुन ‘तुमचे पती घरात आहेत का,’ असे विचारत घरात प्रवेश केला. सासऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित महिला त्यांना सोडवण्यास गेली असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव उर्फ विकी फाळके आणि गणेश जाधव या दोघांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत या दोघांनाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे या करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!