
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.१६: कोवीडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत सातजणांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत गोंधळ निर्माण केला. याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश नितीन लोंढे वय 27, स्वप्नील सुभाष धुसाळे वय 30, बसराज जब्बार कांबळे वय 27, प्रशांत मोतीलाल कलाल वय 25, तौसिफ माजिद शेख वय 23, उमेश जगन्नाथ बनसोडे वय 28, शाहरूख राजू शेख वय 27 सर्व रा. भिमाबाई आंबेडकरनगर, सदर बझार सातारा अशी त्यांची नावे आहेत. कोवीडचा संसर्ग वाढण्याची शक्यता असतानाही सर्व संशयितांनी विनाकारण रस्त्यावर एकत्र जमत गोंधळ निर्माण करून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
