सातार्‍यात पुन्हा कोयत्याने हल्ला; प्रसंगावधान राखल्याने युवक बचावला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२३ | सातारा |
सातार्‍याजवळ असलेल्या रणदुल्लाबाद येथील युवक कारमधून जात असताना राधिका रोड येथील सेनॉर चौकामध्ये कार थांबवून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडली आहे. मात्र, प्रसंगावधान राखून तो युवक नजीकच्या शेतात पळून गेल्याने बचावला. सौरभ पवार (रा. रणदुल्लाबाद, ता. सातारा) असे हल्ल्यातून वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रणदुल्लाबाद येथील सौरभ पवार याचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. तो शनिवारी सायंकाळी सातार्‍यात भाडे ठरवण्यासाठी आला होता. पुन्हा घरी जात असताना राधिका रस्त्यावरील सेनॉर चौकात दुचाकीवरून तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. गाडीची काच लावली असल्याने काचेवर कोयत्याचा वार बसला. प्रसंगावधान राखून तो कारमधून खाली उतरून नजीकच्या शेतात पळून गेला. हल्लेखोरांनीही त्याचा पाठलाग केला. मात्र, सौरभ सापडला नसल्याने ते पुन्हा घटनास्थळी आले व त्यांनी कारची तोडफोड केली.

नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने हल्लेखोर दुचाकी घेऊन पसार झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!