कण्हेर धरणात युगुलाची आत्महत्या? धरण परिसरात बघ्यांची गर्दी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । शुक्रवारी दुपारी कण्हेर धरणातील पाण्यावर एका युवतीचा मृतदेह तरंगताना आढळला. तर तिच्यासोबत असलेल्या युवकाचा मोबाईल व गॉगल धरणा शेजारी पाण्यालगत सापडल्याने मुलगा धरणात बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. ज्योत्स्ना कुमार लोखंडे (वय 24, रा. शुक्रवार पेठ, सातारा) तर मुलगा अरबाज इब्राहिम देवानी (वय 25 रा. बुधवार पेठ, सातारा) अशी दोघांची नावे आहेत.

हे युगुल दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती होती . कण्हेर धरणाजवळ संबधित मुलाची दुचाकी व गॉगल आढळून आल्याने काही तरी दुर्घटना झाल्याची शक्यता बळावली होती .युगुलांपैकी मुलीचा मृतदेह यंत्रणेच्या पथकाला आढळल्याने धरण परिसरात बघ्यांची गर्दी जमली . सातारा तालुका पोलिसांची यंत्रणा सखोल तपास करत आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून दोघांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने पोचत शोधकार्य सुरू केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. या युगुलाने आत्महत्या का केली याचा शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!