कोव्हिड योध्दा म्हणुन नगरसेवक अनुप शहा सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 12 : संपूर्ण जगामध्ये कोरोनाया महाभयंकर विषाणूमुळे श्रीमंतां पासून ते सर्वसामान्य माणसांच्या जगण्यावर परिणाम केला आहे. परंतु त्यामधील गरीब, बेघर, विकलांग, अनाथ यांची 31 मार्च 2020 पासुन 10 जुन 2020 पर्यंत महाराष्ट्रात प्रथमच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात लोकांना दोन वेळेस मोफत जेवणाची सोय नगरसेवक अनुप शहा यांनी सकल जैन फौंडेशन, चावडी चौक मित्रमंडळ यांच्या सहकार्याने केली होती. या उपक्रमांमध्ये ज्यांचेे खरंच जेवणाचे हाल होते, त्यांनाच जेवण दिले जात होते. या उपक्रमाबद्दल के.बी. एक्सपोर्टचे संचालक सचिन यादव यांनी विशेष दखल घेवुन नगरसेवक अनुप शहा यांना कोव्हिड योध्दा म्हणुन सन्मानित केले आहे.  

सदरील कोव्हिड योध्दा म्हणुन सन्मानित करताना के.बी एक्सपोर्टच्या वतीने हेमंत खलाटे, संदीप शिंदे, योगेश यादव, समीर खिलारे यांनी नगरसवेक अनुप शहा यांच्या घरी जावुन सन्मानित केले, त्या वेळी नगरसेवक अनुप शहा म्हणाले की, राजकारणाच्या वेळी राजकारणच करणार आहोत. परंतु ज्या वेळी सर्वसामान्य जनता अडचणीत असेल त्या वेळी कायमच आपण जनतेला सहकार्य करित राहणार आहोत. के. बी. एक्सपोर्टसचे संचालक सचिन यादव यांनी जी दखल घेवुन सन्मानित केले, त्या बद्दल शहा यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!