नागपुर व पिंपरी चिंचवड येथील दलित तरुणांच्या हत्येप्रकरणी नराधमांना फाशी द्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. 12 : नागपुर येथील अरविंद बनसोड हत्याकांंड व पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप या तरुणाच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ फलटण येथे कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक सनी काकडे, महादेव गायकवाड, रवि मोरे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,27 मे रोजी नागपुर येथील अरविंद बनसोड या भिमसैनिकाचा मिथलेश उमरकर या गॅस एजान्सीच्या मालकाने निघृणपणे खुन केला व त्याचबरोबर 8 मे रोजी पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या 20 वर्षीय तरुणास भर रस्त्यामध्ये लोखंडी सळई, तलवार, दांडके, कोयत्याने मारहाण करुन जीवे मारले.हेमंत कैलास काटे, सागर जगदिश काटे, रोहित जगदिश काटे, कैलास मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे या नराधमांनी त्याचा खुन करुन अंगावर थुंकुन जातीवाचक शिवीगाळ केली. यामुळे प्रकरणांमुळे संपुर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्ही गुन्ह्याच्या निषेधार्थ येथील उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यात यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!