स्थैर्य, सातारा, दि. १७ : कोरोना साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागठाणे (ता.सातारा) येथील व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी गुरुवारी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागला आहे.नागठाणे हे आठवडा बाजाराचे गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात.सध्यातरी नागठाणे गाव कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली नाही.मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागठाणे ग्रामपंचायतीतर्फे येथील व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मोफत चाचणी गुरुवार दि.१८ मार्च रोजी सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत गावातील मारुती मंदिरात होणार आहे.तरी गावातील सर्व व्यापारी बंधूनी ही चाचणी करावी असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.