
दैनिक स्थैर्य । दि. 30 मे 2025 । सातारा । राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात सुध्दा पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला असुन सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
तर दुसरा रुग्ण हा कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार घेत असुन तो कराड तालुक्यातील बनवडी गावातील आहे.
तरी नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोनाबाबतच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.