
स्थैर्य, म्हसवड, दि. 3 : नागरीकांनी कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार करुन घ्यावेत, घाबरुन जाऊ नये कोरोना आजार मारक नसून बाधक आहे आजाराला घाबरुन लक्षणे लपवू नयेत असे आवाहन प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे – सोनवणे यांनी माण खटाव मधील जनतेला केले आहे.
सातारा जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन माण यांच्या आदेशानुसार आज माण तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून कोरोना संसर्गाविषयी नागरीकांच्या मनामध्ये असलेले समज गैरसमजाविषयी माहिती व सुचना दिल्या. यावेळी नेमणूक करण्यात आलेली कमिटी “कोविड टास्क फोर्स ” चे प्रमुख श्री अमोल आचरेकर व कोव्हीड 19 एक्पर्ट चेतन सुर्यवंशी यांनी माण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोव्हीड केअर सेंटर, कंटेनमेंट झोन याला प्रत्यक्ष भेट दिली व पाहणी केली. यावेळी सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आशा स्वयंसेविका, मदतनीस यांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात समज, गैरसमज दूर केले. व प्रत्यक्ष सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखणेकामी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी टीम मधील प्रशांत कांबळे व अमन शीकलगार यावेळी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष तुषार वीरकर तालुका आरोग्य अधिकारी कोडलकर मुख्याधिकरी सचिन माने उपस्थित होते.
प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे यांंचे आवाहन – नागरीकांनी करोना संदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार करुन घ्यावेत. घाबरुन जाऊ नये कोरोना आजार मारक नसून बाधक आहे आजाराला घाबरुन लक्षणे लपवू नयेत – प्रांताधिकारी जिरंगे
माण तालुक्यात कोरोना पेशंट वाढत असून आज अखेर संक्रमीत पेशंटची संख्या कमी होती ज्या नागरिकांना काही लक्षणे आढळलेस तात्काळ आशा स्वयंसेविका, मदतनीस व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. नागरिकांना त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी जर तात्काळ उपचार घेतलेस हा आजार लवकर बरा होतो तरी सर्व नागरिकांनी जागरूक होऊन आपले आरोग्याची काळजी घ्यावी. सदर आजाराची कमी तीव्रता व लक्षणे असताना योग्य उपचार घेतलेस पेशंट कमी कालावधीत बरा होऊ शकतो.
जनजागृती व प्रबोधनासाठी कोव्हीड टास्क फोर्स पथक
कोरोना विषयी सर्वसामान्य जनतेमध्ये खुपच गैरसमज आहेत त्यासंदर्भात लोकांच्यामध्ये जावुन त्याठिकाणी त्यांचे प्रबोधन व्हावे सर्वांमध्ये या संसर्गाची जनजागृती व्हावी याकरीत जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाने कोव्हीड टास्क फोर्स या पथकाची निर्मीती करण्यात आली असुन याचे प्रमुख असलेले डॉ. अमोल आचरेकर हे माण-खटावच्या प्रांताधिकारी जिरंगे यांच्या सहकार्याने सध्या माण – खटाव मधील कंन्टेटमेंट झोनमध्ये जावुन लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या या पथकात कोव्हीडचे एक्सपर्ट चेतन सूर्यवंशी, प्रशांत कांबळे, व अमन शिकलगार आदीजण सहभागी आहेत.