दिलीप कुमार यांचे लहान बंधू एहसान खान यांचे ९०व्या वर्षी कोरोनाने निधन


 

12 दिवसात दिलीप कुमार यांच्या घरातील हा दुसरा मृ्त्यू

स्थैर्य, मुंबई, 03 : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या आणखी एका धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये बुधवारी 2 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते आणि कोरोना व्हायरसशी लढा देत होते. रुग्णालयामध्ये कोव्हिड-19 बरोबरच त्यांच्यावर हृदयरोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर यांसारख्या आजारावर देखील उपचार सरू होते. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे.

देशभरात जवळपास सर्वांना कोरोनामुळे विविध बाबींमध्ये फटका बसला आहे. काहींचे आर्थिक नुकसान झाले आहे तर काहींनी आपली माणसं गमावली आहेत. बॉलिवूड देखील कोरोनाच्या फटक्यापासून बचावले नाही आहे. अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. गेल्या 12 दिवसात दिलीप कुमार यांच्या घरातील हा दुसरा मृ्त्यू आहे.

याआधी 21 ऑगस्ट रोजी दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दिलीप कुमार यांचे दोन्ही बंधू एहसान आणि असलम यांचे कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. असलम आणि एहसान दोघांनाही श्वसनाचा त्रास होत होता. दोघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

एहसान आणि असलम यांना 15 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही भावांवर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर करत होते.

दरम्यान दिलीप कुमार त्यांच्या आरोग्याचे अपडेट नेहमी सोशल मीडियावर देत असतात, ते सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!