संततधार पावसाने कास तलावाची पाणीपातळी 51 फूट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। सातारा । सातारा शहराचा जलदाता असणार्‍या कास तलाव परिसरातगेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे येथील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. दुपारी येथील पाणी पातळी 51 फुटांपर्यंत पोहोचली होती. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त नऊ फूट इतक्या पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मे महिन्यातच पाणीच पाणी झाले असून, सातारा शहराचा जलदाता असणार्‍या कास तलाव परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. याठिकाणी होणार्‍या पावसामुळे कास तलावातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील सांडव्याची पातळी 60 फूट उंच असून, सततच्या पावसामुळे येथील पाणीपातळी दुपारी 51 फूट इतकी झाली होती.

Back to top button
Don`t copy text!