काँग्रेस नेते महादेव सुळे यांचा भाजपात प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । मुंबई । नवी मुंबईतील काँग्रेस नेते महादेव आबा सुळे यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. श्री.सुळे हे काँग्रेसच्या प्रदेश शिक्षण सेलचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री.सुळे यांची प्रदेश भाजपाच्या शिक्षक सेल सहसंयोजकपदी नियुक्ती करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!