फलटण तालुका शिक्षक संघाच्यावतीने तानाजी बरडे यांचा अभिनंदनपर सत्कार


स्थैर्य, फलटण दि.31 : फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी ‘विशेष सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. याबद्दल फलटण तालुका शिक्षक संघाच्यावतीने तानाजी बरडे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, विद्यमान संचालक अनिल शिंदे, माजी संचालक विक्रम दिवटे, ज्येष्ठ नेते डी.वाय.शिंदे, मार्गदर्शक बाळकृष्ण मोरे, फलटण तालुका शिक्षख संघाचे कार्याध्यक्ष हणमंत चिंचकर, कास्ट्राईब संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष अनंत काकडे, फलटण तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश जाधव, श्री.काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!