
दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी १३ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. बुधवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी त्यांनी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार श्री. अनिल किसन डांगे त्यांच्या जागी कु. स्नेहा अनिल डांगे, सौ. दीपमाला रमेश वाघेला यांच्या जागी कु. गोपाळ रमेश वाघेला या दोघांना वारसा हक्काने नियुक्तीपत्र दिले. त्याबद्दल अखिल भारतीय मजदूर संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजू मारुडा यांनी निखिल मोरे यांचे अभिनंदन केले.
यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारुडा, मनोज मारुडा अध्यक्ष, फलटण शहर, रमेश वाघेला उपाध्यक्ष, फलटण शहर, फलटण नगर परिषदेच्या अधिकारी साधना पवार, विजय मारुडा टंकलेखक, राकेश गलियल लिपिक, रुपेश इंगळे, आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक पी. के. तुळशे, भोसले, राक्षे, संघटनेचे आनंद डांगे, नितीन वाळा, लखन डांगे, अनिल डांगे, विनोद मारुडा, प्रकाश मारुडा, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, बबलू डांगे, अजय मारुडा, रोहित मारुडा, सौ. दीपमाला वाघेला, सौ. शीतल वाळा, कल्पना वाळा उपस्थित होते.