फडतरवाडी दुचाकी चोरीतील आरोपी जेरबंद


दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
फडतरवाडी (ता. फलटण) येथून राहत्या घरासमोरून नानासो किसन चव्हाण यांची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल (क्र. एमएच-११-सीपी-८२४७) ही दि. १९ जून २०२४ रोजी रात्री ते २० जून २०२४ रोजीच्या २.०० वाजण्याच्या दरम्यान चोरीस गेली होती. याची फिर्याद चव्हाण यांनी फलटण शहर पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून दुचाकी चोरटा वाघिल्या गुलकंद काळे (रा. कुरवली बु., ता. फलटण) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

या प्रकरणी अधिक तपास पी. एन. कदम करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!