
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । मुंबई । महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात की, हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात.
