संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । सातारा । नागरिकांनी आपले कौटुंबिक वाद विवाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामंजस्याने सोडवावेत. कोणताही वाद जास्त न ताणता  संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि वकील संघ जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीमती धोटे बोलत होत्या. याप्रंसगी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा सरकारी वकील ॲङ महेश कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष सुखदेव पाटील उपस्थित होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी या लोक अदालतीमध्ये एकूण  12 पॅनेल आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता  व ज्यांना न्यायालयात येणे शक्य नाही अशा पक्षकारांसाठी एक पॅनेल ऑनलाईन आहे. आजच्या लोक अदालतीमध्ये एकूण 9 हजार 117 प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी 3 हजार 288 प्रकरणे वादपूर्व आहेत. तसेच ग्रामपंचयातीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे ठेवण्यात आली असल्याचे सांगितले.

यावेळी  सर्व जिल्हा न्यायाधीश, वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!