
दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फळांचे गाव असलेल्या धुमाळवाडी (ता. फलटण) येथील शेतकर्यांच्या अभ्यास दौर्याचे आयोजन परळी वैजनाथ (जि. बीड) येथील कृषी महोत्सवासाठी करण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच नवनवीन विकसित झालेले कृषी यांत्रिकीकरण तसेच प्रत्यक्ष कृषी महोत्सव भेटीद्वारे शेतकर्यांना अभ्यास होऊन इतर शेतकर्यांनी त्याचे अनुकरण करावे, हा मुख्य उद्देश या दौर्याचा आहे.
कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा साताराअंतर्गत अभ्यास दौर्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी फलटण सुहास रनसिंग, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक विडणी अजित सोनवलकर यांनी यावेळी शेतकर्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी धुमाळवाडी व सासकल या गावातील शेतकरी तसेच कृषी सहाय्यक सचिन जाधव उपस्थित होते.