ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे रविवारी आयोजन : सहभागी होऊन लाभ घ्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । अमरावती । नुकतेच १० वी व १२ वी चे निकाल लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशन, अमरावती तर्फे एका ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या मालुका आयएएस अकादमीचे प्रशिक्षक श्री प्रशांत भाग्यवंत हे आज अमरावतीला आले असून रविवारी होणाऱ्या झूम मिटींगला व ऑफलाइन कार्यशाळेला ते विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
दिल्लीची मालुका आयएएस अकादमी ही डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीला आयएएसचे विनामूल्य कोचिंग उपलब्ध करुन देते. झूम मीटिंग नंतर ते अमरावती मधील दहावी – बारावीनंतर आयएएस करणाऱ्या व करु इच्छिणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील.

रविवार दि. १९ जून रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या झूम मिटिंगचा आयडी 83973422244 क्रमांक हा असून पासवर्ड 333967 हा आहे. ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी बरोबर १० वाजता झूम मिटींगमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे फक्त एका रुपयांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या मिशन आयएएस ह्या संस्थेतर्फे प्रा. प्रवीण खांडवे, प्रा. नरेशचंद्र काठोळे, प्रा. पल्लवी एरुळकर काठोळे यांनी एका संयुक्त पत्रकाव्दारे केले आहे.

श्री प्रशांत भाग्यवंत हे रविवारी अमरावतीला उपलब्ध असून इच्छूक पालक त्यांची भेट घेऊन आयएएस बद्दल मार्गदर्शन घेऊ शकतात. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असून संपूर्ण भारतामध्ये ३५० आयएएस, आयपीएस, आयएफएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेली ही एकमेव संस्था आहे. या संस्थेचे उद्घाटन २२ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव व तत्कालीन जिल्हाधिकारी श्री विकास खारगे साहेब यांनी दि. १२ मे २००० रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात केले आहे.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, अमरावती.


Back to top button
Don`t copy text!