
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुन २०२२ । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा दि. ०१ व ०२ जुलै रोजी फलटण शहरात मुक्कामी आहे व त्यानंतर फलटणमधुन पुढे पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. याच प्राश्वभुमीवर मंगळवार दि. २१ जुन २०२२ रोजी नगरपरिषदेचा जलशुद्धीकरण प्रकलपाचा टॅंक स्वच्छ करायचा आहे. त्यामुळे फलटण शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. २१ जुन २०२२ रोजी करण्यात येणार नाही, याची नोंद फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांनी केले आहे.