नुकसान भरपाई घरात बसून द्यायची नसते : चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सांगली, दि.१९: नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला. विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्याासाठी दबाव आणत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

एरवी शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेचे वेध लागल्याने ते शांत बसले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्य सरकरने मदतीबाबत केंद्राकडे मागणी केली का? राज्य सरकारने कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का?, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!