दुधेबावी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह; शेकडो कार्यकर्ते भाजपात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2025 | फलटण | तालुक्यातील दुधेबावी गावामध्ये येणाऱ्या काळात सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्व जण कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळामध्ये दुधेबावी गावाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

दुधेबावी गावातील राजे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

दुधेबावी ग्रामपंचायतीचे माजी भाऊसाहेब मोरे, तानाजी मोरे, संतोष मोरे, मनोज मोरे, सनी मोरे, समीर मोरे, लक्ष्मण मोरे, योगेश मोरे तसे सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव सोनवलकर, नानासाहेब आडके, माजी सरपंच त्रिंबक सोनवलकर, उत्तमराव सोनवलकर, संतोष सोनवलकर, भाऊसाहेब सोनवलकर व गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले की, फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे व गावांमधील जे काही उर्वरित प्रमुख कार्यकर्ते लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!