देसाई इस्टेट प्रभागाच्या च्या विकासासाठी कटिबद्ध : अतुल बालगुडे


दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । बारामती । विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई इस्टेट मधील प्रभागाच्या विकासा साठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बारामती नगर परिषद चे मा नगरसेवक अतुल बालगुडे यांनी केले. गुरुवार दि.02 सप्टेंबर रोजी देसाई ईस्टेट च्या मध्य वस्ती मधील अक्षय आंनद कम्युनिटी सेंटरच्या शेजारील ओपन स्पेस वरती मा. नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या प्रयत्नातुन क्लोल स्टोन व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बँजेस (सिमेंट बाकडे ) अशा 2 लाख रुपये किमतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी अतुल बालगुडे बोलत होते.या वेळी देसाई इस्टेट मधील श्री रेवडे ,विलास शिंदे सतिश उडगे ,कदम काका , निवृत्ती बोरावके , होळकर सर , पाठक गुरुजी ,दुर्गेश धर्माधिकारी , अरुण गायकवाड , ढोरगे साहेब,माजी सरपंच छगन आटोळे , शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष संग्राम खंडागळे, न्यू युवा शिवक्रांती चे अध्यक्ष हेमंत नवसारे,राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष युवराज गजाकस व साहील शेख, , आमोल पवार ,विनित ठोंबरे, मनोज शिंदे व श्री छत्रपती राजे प्रतिष्ठान व श्री गणेश तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्तित होते. उपस्थितांचे स्वागत राहुल वायसे निलेश पवार यांनी केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय भाऊ आटोळे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन संग्राम खंडागळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!