कामगार च्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध : बाळासाहेब डेरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील फेरेरो इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईस युनियन या कामगार संघटनेच्या 11व्या वर्धापन दिना निमित्त संघटनेच्या फलकाचे पुजन करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे संस्थापक उप-अध्यक्ष महादेव गोसावी, माजी सचिव मनोज भोसले, माजी उप-अध्यक्ष सचिन गवळी ,माजी सह सचिव गणेश सोनार, माजी कार्याध्यक्ष शैलेश बोरकर, संतोष गवळी, सुधीर भोसले, सचिन लंगुटे,चैतन्य गोरे,बाळासाहेब जाधव, विकास हिरवे व फेरेरो कर्मचारी पथसंस्था चे विद्यमान चेअरमन नितीन पवार, व महिला प्रतिनिधी माजी कोषाध्यक्ष शीतल शेंडे, पौर्णिमा भोसले, अनिता चव्हाण आदी व कामगार उपस्थित होते.

आपल्या हक्कासाठी व मागण्या साठी संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत,कामगारांची एकजुट व ताकत हि संघटनेची बलस्थाने आहेत व कामगाराच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!