स्थैर्य, खटाव, दि. 26 : आ. शशिकांत शिंदे युवा प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषदेच्या पांगरी, ता. माण येथील शाळेत कोविड-19 या आजाराची थर्मल स्क्रिनींगची तपासणी सामाजिक अंतर राखत सुरू करण्यात आले होते. गावातील जवळपास 663 नागरिकांची विनामूल्य तपासणी करण्यात आली.
या तपासणीसाठी शशिकांत शिंदे युवा प्रतिष्ठानचे माण तालुकाध्यक्ष व सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक पिंटू जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी पांगरी गावचे प्रथम नागरिक सरपंच दिलीप आवळे, उपसरपंच तात्याबा दडस, संतोष लोखंडे, समीर गायकवाड, किरण गायकवाड, शामराव गायकवाड, अजित गायकवाड, सागर गायकवाड, राजेंद्र गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नसीर मुलाणी, दत्ता कुंभार,संदीप गायकवाड, वैभव गायकवाड, तानाजी लोखंडे, सत्यवान जाधव, शैलेश खरात, अकबर गागडे, गिरीजाप्पा दडस, नवनाथ देशमुख, योगेश दडस, मी पांगरीकर ग्रुपचे सदस्य व मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.