वडजलजवळ दुधाचा टँकर व कारमध्ये धडक; सातजण जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
लोणंद – फलटण रस्त्यावर वडजल गावच्या हद्दीत आज दुपारी १.३० वाजता दुधाचा टँकर व कारमध्ये झालेल्या धडकेत सातजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टँकरचालक हनुमंत कोंडीबा मोरे (रा. सोनवडी खुर्द, ता. फलटण, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात दुधाचा टँकर व कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात कारचालक योगेश साहेबराव बडक, लता शिवनाथ खरात, पूजा उमेश खरात, उमेश बाबासाहेब खरात, बाबासाहेब बबन खरात (सर्व राहणार तळेगाव, तायगाव, सिल्लोर, जिल्हा औरंगाबाद), दीपक भगवान बडक, प्रियंका दीपक बडक (दोघेही राहणार पळशी, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद) हे सातजण जखमी झाले आहेत.

या अपघाताची अधिक माहिती अशी, दि. १९ ऑटोबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गोविंद दूध डेरी ट्रक (क्रमांक एमएच-११-सीएच-७६९३)हा लोणंद ते फलटण जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना वडजल गावाजवळ विरूध्द बाजूने फलटण ते लोणंदकडे जाणार्‍या रस्त्यावरून फिर्यादीचा ट्रक व आरोपीचे पांढर्‍या रंगाचे ईरटीगा मोटार कार (क्रमांक एमएच-२०-एफपी-०५८२) यावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवून त्याच्या स्वतःच्या कारचे व फिर्यादीचे ट्रकचे नुकसानीस व वरील इसमांच्या किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारचालक योगेश साहेबराव बडक (राहणार पळशी, तालुका सिल्लोर, जिल्हा औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!