सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी थोर स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । सांगली । सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‍ पलूस तालुक्यातील कुंडल येथे थोर स्वातंत्र्य सैनिक कै. कॅप्टन रामचंद्र लाड यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी आमदार अरूण लाड, ‍किरण लाड, सुभाष पवार, मोहन पवार, श्रीकांत लाड आदि उपस्थित होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारच्या तुफान दलाचे थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी कुंडल येथे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुंडल येथे भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!