भारतानेच कोरोना पसरवल्याचा चीनचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.११: कोरोनाचे सुरुवातीची प्रकरणे चीनच्या वुहान शहरातून आले, तेथे WHO ची टीम दाखल झाली. 14 जानेवारी रोजी दाखल झालेल्या या टीमने 9 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी सांगितले, परंतु जे सांगितले ते WHO च्या तपासाचा निष्कर्ष कमी आणि चीनच्या प्रोपेगेंडाचे समर्थन वाटत होते.

तोच प्रोपेगेंडा ज्यामध्ये चीन कधी भारत, कधी ब्राझील तर कधी युरोपीय देशांना ओढत राहिला. तोच प्रोपेगेंडा ज्यामध्ये कोरोना व्हायरस चीनमधून नाही तर अन्य देशांमधून पसरल्याचे सांगितले जात होते. ज्यास जगातील इतर कोणत्याही देशाने आत्तापर्यंत समर्थन दिले नाही.

मंच WHO चा, बोल चीनचे आणि निशाणा भारतावर

WHO च्या टीमसोबत चीनी वैज्ञानिक देखील काम करत आहेत. चीनी वैज्ञानिकांचे प्रमुख लियांग वानियन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, कोरोनाची सुरुवातील प्रकरणे सी-फूड मार्केटच्या आसपासच्या भागाव्यतिरिक्त इतर शहरातूनही आले होते. यामुळे व्हायरस सी-फूड मार्केटऐवजी इतर ठिकाणाहून आला असेल, असे होऊ शकते.

या सिद्धांताला चीनशिवाय इतर कोणत्याही देशाने पाठिंबा दर्शविला नाही, परंतु डब्ल्यूएचओ च्या व्यासपीठावरून चीनने पुन्हा एकदा हा प्रचार केला आहे. त्यांचा इशारा भारत आणि ब्राझीलसारख्या देशांकडे होता कारण चीनने नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की, 2019 च्या उन्हाळ्यात कोरोनाची भारतात उत्पत्ती झाली. ते जनावरांद्वारे गलिच्छ पाण्यातून मानवापर्यंत पोहोचला आणि येथून जगात पसरला.

तर डिसेंबर 2020 मध्ये चीनी शास्त्रज्ञांनी दावा केला होता की, ब्राझीलहून आलेल्या फ्रोझन फूडमध्ये कोरोनाचे जिवंत विषाणू आढळल होते. मात्र त्यावेळी WHO ने चीनचा हा दावा फेटाळून लावला होता.

ट्रम्प ज्या चीनी लॅबमधून व्हायरस पसरल्याचे सांगत होते, ते देखील फेटाळले

WHO ची टीम 14 जानेवारी रोजी वुहानला पोहोचली. 14 दिवस क्वारंटाइन राहिली. त्यानंतर 12 दिवस वुहानमध्ये वेगवेगळ्या साइट्सला भेट दिली आणि तपास केला. मंगळवारी या टीमने वुहानच्या लॅबमधून व्हायरस पसरल्याचा ट्रम्प यांचा दावा देखील फेटाळला. ते म्हणाले की, लॅबमधून कोरोना पसरण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र कोरोना वुहानमध्ये कसा पोहोचला आणि तेथून जगभरात कसा पसरला याबाबत काही सांगू शकत नाही.

कोरोना कसा पसरला, याबद्दल काहीही स्पष्ट सांगितले नाही

WHO चे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ज्ञ पीटर बेन एम्बार्क यांनी सांगितले की, विषाणूचा स्त्रोत शोधण्याची ही पहिली पायरी आहे. हा विषाणू पांगोलिन किंवा बाबू रॅट यांसारख्या एखाद्या वन्य प्राण्यापासून मनुष्यांपर्यंत पोहोचला असावा, असा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किंवा वटवाघळांमधून थेट मानवांमध्ये आला असेल. आणि हे देखील शक्य आहे की फ्रोझन फूडद्वारे हा विषाणू मनुष्यांपर्यंत पोहोचला असेल.

WHO च्या तपासावार अमेरिकन तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

> अमेरिकन संस्था AIDS हेल्थकेयर फाउंडेशनने या तपास अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. WHO च्या तपास पथकातील काही लोकांचा कल चीनकडे असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. काही शास्त्रज्ञांवर तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्टची देखील प्रकरण बनते. जोपर्यंत पूर्णपणे स्वतंत्र तपास पथक वुहान येथे चौकशीसाठी जात नाही तोपर्यंत अशा कोणत्याही चौकशीत नेमकी कारणे उघड होणार नाहीत.

> जागतिक आरोग्यावर काम करणार्‍या यानझोंग हुआन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, चीनच्या प्रभावात त्यांच्या हिशोबाने तपास केला आहे. ते म्हणतात की, WHO ला चीनवर आवश्यक डेटा आणि अॅक्सेससाठी दबाव टाकावा लागेल. सध्या ही टीम चीनी सरकारने निश्चित केलेल्या पॅरामीटर्सवर काम करत आहे. यातून बरेच काही बाहेर येणार नाही.

> काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर कोरोना पसरण्यासाठी इतर देशांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न होत असेल तर हा तपास आपल्या ध्येयावरून भटकेल. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत काय झाले. हे जाणून घेण्यासाठी चीनमध्ये हा तपास अत्यंत महत्वाचा आहे, यामुळे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही महामारीला रोखता येऊ शकते.

हूणच्या सीफूड मार्केटमधून कोरोना पसरला या सिद्धांतावर WHO च्यी टीमने काय काय म्हटले?

WHO च्या टीमध्ये समाविष्ट नेदरलँड्सचे व्हायरोलॉजिस्ट मेरियन कॉपमेन्स यांनी सांगितले की, या सी-फूड मार्केटमध्ये ससे आणि बांबू रॅट सारखे असे जनावरांची विक्री होते, जे वटवाघळाच्या अधित संपर्कात असतात आणि यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे.

WHO टीम वुहानमध्ये का गेली ?

जगात सर्वप्रथम वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यामुळे WHO ने वुहानला जाण्याचे ठरवले. डिसेंबर 2019 मध्ये वुहानचे लोक या महामारीच्या विळख्यात सापडत होते. यापैकी बहुतांश लोकांना येथील मोठ्या सी-फूड मार्केटशी संबंध होता. झपाट्याने वाढत असलेल्या प्रकरणांचा विचार करता चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने तपासणीसाठी एक पथक पाठविले होते. 23 जानेवारी 2020 रोजी येथे लॉकडाउन लादला गेला. मार्चमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 76 दिवसांनंतर 8 एप्रिल रोजी वुहानमधून लॉकडाउन हटवण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!