स्व. चिमणराव कदम यांचा गट आजही सक्षम; तालुका भूलथापांना बळी पडणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 05 मे 2024 | फलटण | फलटणचे माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचा गट आज सुद्धा खंबीर पणे कार्यरत आहे. कदम साहेबांच्या नंतर आमचे नेते सह्याद्री चिमणराव कदम यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील स्व. चिमणराव कदम यांचा गट सक्षमपणे कार्यरत आहे. निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मुद्दामून कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या भूलथापांना फलटण तालुक्यातील जनता बळी पडणार नाही; असे मत रविवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष तथा सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम युवा मंचचे अध्यक्ष सुरज कदम व गिरवीच्या सरपंच सौ. वैशाली राजेंद्र कदम यांनी व्यक्त केले आहे.

आज फलटण येथे बोलताना सुरज कदम यांनी सविस्तर माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे 55 वर्षाचा संघर्ष संपवून काही दिवसांच्या पूर्वी फलटण येथे सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी आले होते. त्यामुळे फलटण तालुक्यातील लोकसभेची गणिते नक्कीच बदलणार आहे. ह्या लोकसभेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आमचे नेते सह्याद्री कदम हे काम करीत आहेत व त्याचा परिणाम येत्या 4 जुन रोजी दिसणार आहे; असेही मत यावेळी सूरज कदम यांनी व्यक्त केले.

आताच्या लोकसभेला आमचे नेते सह्याद्री कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच अपप्रचार करणे गरजेचे आहे; असेही सौ. कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी कायमच कामकाज केले होते. त्यांच्यानंतर आमचे नेते सह्याद्री कदम हे आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही स्व. चिमणराव कदम यांचा गट कायम कटिबद्ध आहे. सध्या राजकारणामध्ये भूमिका दुसरी घेतल्याने विरोधी गट मुद्दामून अफवा पसरवत आहे; असेही सुरज कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!