मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण आणि त्यांना वंदन करणे आद्य कर्तव्य आहे. महात्मा गांधी यांचा जीवनमार्ग हाच एक संदेश आहे. स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा यासह स्वच्छता, ग्रामविकासाबाबतची त्यांची शिकवण आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. शांती, अहिंसेचे महान दूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!