दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, विकास कुंभारे, किशोर जोरगेवार,सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.