मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली.

या भेटीत श्री शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या सोबत होते.

याप्रसंगी श्री. शहा यांनी श्री. शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!