
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । मुंबई । भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर एस. परमेश यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. महानिरीक्षक एस. परमेश यांनी अलीकडेच या विभागाचा कमांडर म्हणून पदभार स्वीकारला आहे. या विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण आणि लक्षद्वीप बेट समुहांचा समावेश आहे.
या अनुषंगाने कमांडर परमेश यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची भेट घेतली, तसेच तटरक्षक दलाचे मानचिन्ह भेट दिले.
