छोट्या उर्फ तौसिफ अब्दुल शेख सहा महिन्यासाठी तडीपार; प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांची कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । फलटण । येथील छोट्या उर्फ तौसिफ अब्दुल शेख, रा. गजानन चौक, गोल्डन बेकरी शेजारी, फलटण ह्याला सहा महिन्यासाठी फलटण तालुक्यातुन तडीपार करण्यात आलेले आहे. पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या शिफारसीनुसार फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सदरील कारवाई केली आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिलेली माहिती अशी की, छोट्या उर्फ तोसिफ अब्दुल शेख, रा. गजानन चौक, गोल्डन बेकरी शेजारी, फलटण याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे प्रस्ताव सादर करून नमूद इसम यास एक वर्षाकरिता फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात यावा याबाबत विनंती केली होती, त्याप्रमाणे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी नमूद इसमास फलटण तालुक्यातून सहा महिन्याकरता तडीपार करण्यात आलेले आहे.

सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर, शरद तांबे व पोलीस नाईक यांनी कामकाज पाहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!