छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथर्‍याची दुरूस्ती व सुशोभीकरण करावे


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण यांच्या सर्व शिवभत धारकर्‍यांनी फलटण शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या चौथर्‍याची दुरूस्ती व सुशोभीकरण करावे, अशी मागणी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे अर्जाद्वारे केली आहे.

अर्जात म्हटले आहे की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण गेल्या आठ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची नित्य पूजा करत आहे. या पुतळ्याच्या भोवतीचा असलेला चौथरा हा जीर्ण झाला आहे. तसेच बाहेरील सुशोभीकरणाची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी हा गाभारा दुरूस्ती व सुशोभीकरण ताबडतोब करणे आवश्यक आहे.


Back to top button
Don`t copy text!