मिरगाव येथे एकास काठीने मारहाण


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
मिरगाव (ता. फलटण) येथे दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता खडकी पाटी हद्दीतील तलावाशेजारील शेतात रामचंद्र अण्णा सरक यांना माझे वडिलांनी ‘मला शेत नीट करायचे आहे, तू तुझ्या शेळ्या माझे शेतातून घेऊन जा’ असे म्हणाल्याच्या कारणावरून रामचंद्र आण्णा सरक (रा. मिरगाव) यांनी पांडुरंग सदाशिव सरक (वय ३२, रा. मिरगाव) यांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी रामचंद्र आण्णा सरक (रा. मिरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. ना. बनकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!