स्थैर्य, वडूज, दि.१७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इ ५वी व इ ८वी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालात या शाळेने आपली निकालाची परंपरा कायम राखली. इ ५वी शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी विभागातून प्रतिक शशिकांत काळे यांने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ज्ञानेश्वरी कोरे, आदित्य साबळे, अस्मिता हांगे, अथर्व ओंबासे, ऋतुजा खरमाटे, राजवर्धन देशमुख, शर्वरी वावरे या आठ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्रस्थापित केले. व तीस विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले असून एकूण ३८ विद्यार्थी इ ५वी शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.तसेच इ ८वी शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी विभागातून संकेत सजगणे, ऋतुजा माळवे, पार्थ माने, सोहन जाधव, पारस वाघ या पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्रस्थापित केले. तसेच २१ विद्यार्थां जिल्हा यादीत ही चमकले असून असे एकूण २६ विद्यार्थी इ ८वी शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
छत्रपती शिवाजी हायस्कूल वडुजचे इ ५वी व इ ८वी शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत एकूण १३ विद्यार्थी तर जिल्हा गुणवत्ता यादीत ५१ विद्यार्थांचा समाविष्ट झाले आहे. शाळेचे असे एकूण ६४ विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.
सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थींचे छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडुजचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांच्या उपस्थितीत माजी निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुखसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव व्ही.आर. गोडसे, विकास अधिकारी आर. एन.घाडगे, मुख्याध्यापक डी.एन. जाधव, उपमुख्याध्यपक ए.बी. खरात, पर्यवेक्षक बी.बी.राऊत, एम.आर.गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व यशस्वी विद्यार्थांचे संचालक, सभासद, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.