दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । सातारा । फलटण येथे आय टी आय फलटण यांच्या वतीने कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या शिबिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचे पायावर उभे राहावे, असे मत फलटण विधानसभा सदस्य आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. धुमाळ, प्राचार्य एन के माने उपस्थित होते.
यावेळी करिअर मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉ पडळकर संचालक चैतन्य अकादमी बारामती यांनी नीट JEE, CET यांबद्दल माहिती दिली. प्राध्यापक खरात एस. एम. यांनी अँग्री कल्चर मधील सुवर्ण संधी सांगितल्या. कार्रवर Aviation चे मंजीत यांनी पायलट ट्रेनिंग संबंधी माहिती दिली. तसेच प्राध्यापक श्री निंबाळकर यांनी मुलाखत तंत्र व सॉफ्ट स्किल्स या बद्दल माहिती दिली.