दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । फलटण । फलटण शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसह इतर व्यावसायिक सुद्धा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. आता आगामी काळामध्ये वाहतुकीचे नियम जो कोणी मोडेल त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला आहे.
फलटण शहरामधील विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे त्यांच्या टीमसह बेशिस्त वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ते दुचाकी वाहनचालक, चारचाकी वाहनचालक, रिक्षाचालक व इतर वाहतूक चालक यांना पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे वाहतुकीचे धडे दिले.