छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
फलटण येथे मंगळवारी आय.टी. आय. फलटण यांच्या वतीने कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या शिबिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

आ. चव्हाण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. धुमाळ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. एन. के. माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी चैतन्य अकादमी बारामतीचे संचालक प्रा. डॉ. पडळकर, प्रा. श्री. खरात एस. एम. ‘कार्रवर अवेशन’चे मंजित सर, प्रा. डॉ. प्रशांत निंबाळकर, श्री. ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!