दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२५ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणतर्फे श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सत्कार चौधरवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.
या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषि संबधित कंपन्या, शेती व्यवसायाला लागणार्या कृषी निविष्ठा, शेती यांत्रिकीकरण, महिला बचत गट उद्योग, गांडूळखत निर्मिती, हातमाग व घर उद्योग, चर्मकार उद्योग, लोणचे व्यवसाय, विविध कुटिर उद्योग व कृषि विषयक विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनात फलटण तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, शेती यंत्र व अवजारे, मोटार गाड्या, शेती तंत्र यांची बहुसंख्य प्रमाणात शेतकर्यांना अधिकृत विक्रेत्यांनी विक्री करण्यात आली. प्रदर्शनाच्या अखेर पर्यंत फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील ८०,००० पेक्षा जास्त शेतकर्यांनी कृषि प्रदर्शनाला भेट दिली व श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५ हे फलटण तालुक्यातील शेतकर्यांचे विशेष आकर्षण ठरले होते.
या सत्कारप्रसंगी ग्रामपंचायत चौधरवाडीचे श्री. मुकूंदराव धनवडे, श्री. बुवासहेब गुंजवटे, श्री. बबनराव रणवरे श्री. योगेश भोसले, श्री. प्रमोद भोसले, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)