दैनिक स्थैर्य | दि. ११ जानेवारी २०२५ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथे ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानांतर्गत गृहभेटी देण्यात आल्या. यावेळी कुटुंबातील सदस्यांना या स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली. या स्पर्धेत कोळकी गावातील बहुसंख्य कुटुंबांनी सहभाग घेतला आहे.
या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून ओडीएफ प्लस मॉडेलचे सातत्य राखण्यासाठी वैयतिक शौचालयाचा नियमित वापर करणे, घरगुती कचर्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग निर्मिती करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझर खड्ड्यांचा वापर करणे, त्यासोबत गावातील इतर कुटुंबांना प्रोत्साहित करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
या अभियान कालावधीत स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांना प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला ग्रामसभेमध्ये प्रशस्तीपत्रक, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी :
१) प्रत्येक कुटुंबाकडे घरगुती खतखड्डा किंवा परसबाग असावी.
२) वैयतिक शोषखड्डा किंवा पाझरखड्डा
३) स्वत:चे वैयतिक शौचालय व नियमित वापर
४) कुटुंबस्तरावर ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची सुविधा असावी.
या प्राथमिक गृहभेटीसाठी विस्ताराधिकारी श्री. एस. एस. जगताप, ग्रामपंचायत अधिकारी श्री. साळुंखे तसेच स्वच्छ भारत मिशनचे श्री. अमोल मोरे, श्री. नाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. विकास नाळे, श्री. संजय देशमुख, सौ. रेश्मा देशमुख यांची उपस्थिती होती.