पुसेगावमधील वाहतुकीत आणखी आठवडाभर बदल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 7 डिसेंबर : पुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणार्‍या सातारा-म्हसवड – टेंभुर्णी- लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर असे रुंदीकरण व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. परिणामी नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आजपासून 12 डिसेंबरपर्यंत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनेही नेर फाटा, नेर, ललगुण, राजापूर, कुळकजाई, मलवडी मार्गे दहिवडीकडे जातील + किंवा नेर फाटा, नेर गाव, ललगुण,बुध, छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगावमार्गे दहिवडीकडे जातील. दहिवडी बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगाव येथून खातगुण फाटा, खातगुण गाव, जाखणगाव, विसापूर मार्गे विसापूर फाट्यावरून सातारकडे जातील किंवा पिंगळी येथून वडूज, चौकीचा आंबा, विसापूर, विसापूर फाटा येथून सातारकडे जातील. वडूज बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खटाव येथून जाखणगाव, विसापूर, विसापूर फाट्यामार्गे सातार्‍याकडे जातील. फलटणवरून सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ललगुण येथून नेर, नेर फाट्यामागे सातार्‍याकडे जातील. या वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सव नागरिकांनी व वाहन चालकांनी पोलिस दलास सहकार्य कराळे असे आवाहन सहायक पोलि निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!