ओबीसी समाजाचा फलटणमध्ये चक्का जाम यशस्वी


दैनिक स्थैर्य | दि. 11 डिसेंबर 2023 | फलटण | ओबीसी नेते तथा विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण येथील नाना पाटील चौक येथे फलटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते ते यशस्वी पार पडले. यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर म्हणाले की; संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या आता भावना तीव्र झाल्या आहेत. ओबीसी नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे; त्याचा फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जो इंदापुर येथे भ्याड हल्ला करण्यात आला आहे; आगामी काळामध्ये जर असे हल्ले झाले तर जशास तसे उत्तर देण्यात येईल; असे मत शिवसेनेचे नेते नानासाहेब इवरे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना जाधववाडीचे माजी सरपंच म्हणाले की; ओबीसी समाजाच्या कोणत्याही नेत्यावर आगामी काळामध्ये जर कोणीही काही बोलले किंवा भ्याड हल्ला केला तर राज्यातील ओबीसी समाज शांत बसणार नाही. आमदार पडळकर यांच्यावर जो हल्ला करण्यात आला आहे; त्यांच्यावर कठोर कारवाई करावी; अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!