प्रशासनाची विनंती मान्य करून उद्याचा बंद मागे; रास्ता रोको होणार


दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | फलटण |
सकल ओबीसी समाजातर्फे उद्या, दि. ११ डिसेंबर रोजी ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजातर्फे ‘फलटण बंद’ पुकारण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय विनंतीचा मान ठेवून तसेच सामान्य नागरिक, व्यापारी, हातगाडेधारक, शेतकरी व कष्टकरी कामगार व आगामी राम यात्रा लक्षात घेऊन उद्याचा बंद सकल ओबीसी समाजातर्फे मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या काही घटकांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्यांच्या निषेधार्थ उद्या सकाळी ९ वाजता नाना पाटील चौक येथे रास्ता रोको होणार आहे व या रस्ता रोकोने शासन व प्रशासनाला विनंती आहे की, ज्यांनी कुणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन यापुढे अशा प्रकारचे कृत्य होणार नाही याची दखल घेण्यात यावी.


Back to top button
Don`t copy text!