स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटणमध्ये ‘चक्का जाम’ आंदोलन

ऊस दर दिला नाही तर स्वाभिमानी स्टाईलने तीव्र आंदोलन - धनंजय महामुलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार गतवर्षी तुटून गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये मिळावेत व चालू हंगामातील तुटून जाणार्‍या उसाला एकरकमी ३५०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी आज फलटण-पंढरपूर रोड, जिंती नाका येथे रास्ता रोको करून वाहने अडवून चक्काजाम आंदोलन फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

फलटण तालुक्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर दिला नाही तर स्वाभिमानी स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिला आहे.

आंदोलनस्थळी फलटण शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, उपाध्यक्ष शकिल सिकंदर मणेर, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, प्रल्हाद अहिवळे, माण तालुक्याचे केशव जाधव, किरण विलास भोसले, अर्जुन वारे सर, मनोज वारे, अभिजित गायकवाड, विश्वनाथ यादव यांच्यासह फलटण परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!