ऊसतोड मजुरांना मिठाई देत दिवाळी साजरी

प्रा. अजिनाथ चौधर यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी म्हणून रुई येथील रहिवासी व राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर यांनी उसाच्या फडात जाऊन ऊसतोड मजुरांना मिठाई व दिवाळी फराळ व पणत्यां(दिवा)चे वाटप केले. याप्रसंगी विशाल चौधर, प्रदीप दराडे, जालिंदर चौधर आदी मान्यवर उपस्थित होते.

ऊसतोड मजूर यांची दिवाळी गोड होण्यासाठी व घरामध्ये पणत्या लावता याव्यात म्हणून वाटप केले. सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना त्यांनासुद्धा इतरांसारखी दिवाळी साजरी करता आली पाहिजे, म्हणून दरवर्षी सदर उपक्रम राबविला जाणार असल्याचे प्रा. अजिनाथ चौधर यांनी सांगितले.

आधुनिक बारामतीमध्ये माणुसकी आजही जिवंत आहे व दिवाळी भेटीमुळे समाधान व आनंद मिळाला असल्याचे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महेश नागरगोजे यांनी सांगितले.

साईनाथ चौधर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!