स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

चेन स्नॅचिंग चोरट्यास अटक; कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई; मुद्देमाल जप्त

Team Sthairya by Team Sthairya
November 14, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, कराड, दि.१३: कराड शहर परिसरात व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग व चोर्‍या करणार्‍या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

अक्षय शिवाजी पाटील (वय 22, रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण), बंटी उर्फ विजय अधिक माने (रा. शितपवाडी, ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही महिन्यापूर्वी कराड शहर परिसरात व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग व चोरीच्या घटना घडल्या होत्या. चोरीच्या शोध अनुषंगाने गुन्हे उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आलेले होते. पोलीस चोरीचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस नाईक सचिन साळुंखे, आनंदा जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ढेबेवाडी परिसरातील दोघांनी कराड शहर परिसर व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग केल्या आहेत. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ढेबेवाडी येथून अक्षय पाटील व बंटी उर्फ विजय माने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कराड परिसर, पाटण परिसरात चैन स्नॅचिंग व काही ठिकाणी चोर्‍या अशा सहा गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी केली.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: कराडक्राइम
Previous Post

वाईजवळ दोन सराईत चोरटे जेरबंद; एलसीबीची कारवाई, 1.60 लाखांचा ऐवज हस्तगत

Next Post

राष्ट्रवादीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची फलटण तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

Next Post

राष्ट्रवादीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची फलटण तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार

August 12, 2022

माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

August 12, 2022

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम

August 12, 2022

कारागृहातील बंदिवानांनी भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – माहिती संचालक हेमराज बागुल

August 12, 2022

आदिवासी बांधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला

August 12, 2022

एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन

August 12, 2022

फलटण येथे काँग्रेसची आझादी गौरव यात्रा संपन्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

August 12, 2022

घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप; किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे यांचा उपक्रम

August 12, 2022

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!