स्थैर्य, मुंबई, दि २१: सरकारी मालकीची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला डिसेंबरमध्ये संपलेल्या तिस-या तिमाहीत निव्वळ नफ्यात १६५.४१ कोटी रुपयांचा नफा झाला. बॅंकेने निव्वळ नफ्यात ६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्यापैकी क्राय(चाईल्ड राइट्स अँड यू) या संस्थेला बॅंकेने १८.३५ लाख रुपयांचा धनादेश सोपविला. २२९० वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोजित म्हणून १ वर्षासाठी हा धनादेश सोपविण्यात आला आहे.
बॅंक आणि टाटा एआयए या बॅंकेच्या विमा भागीदारांनी क्रायच्या माध्यमातून वंचित मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी सामाजिक कारणास्तव संपूर्ण भारतभर जीवन विमा पॉलिसी लागू करण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये एक सुनहरा बचपन चॅम्पियन हा उपक्रम चालविला आहे.